टाईम अटॅक या कार रेसिंगच्या प्रकारात पुण्याच्या नवोदित कार रायडर राजकुमार भंडारी यांचे यश
इंटरनॅशनल कार रायडर रेस मध्ये चार गटा मध्ये सहभाग घेत राजकुमार यांनी केले यश संपादन
मनोज बरडे
पुणे: येथे चेतन शिवराम मोटर स्पोर्ट्स बेंगलोर यांचे तर्फे आयोजित केलेल्या टाईम अटॅक या कार रेसिंग च्या प्रकारामध्ये पुण्याचे नवोदित कार रायडर राजकुमार भंडारी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार रायडरच्या बरोबर चुरस करत 1600CC गटामध्ये तिसऱ्या नंबर वरती राहात आघाडी घेत पुण्याचे नाव कायम ठेवले त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कोच इंटरनॅशनल कार रॅली रायडर संजय टकले यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल भंडारी यांचे पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर नितीन टकले, "मराठी अस्मितेचा इशारा" चे संपादक के.वाय. पटवेकर अमित इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड चे एमडी रवींद्र हिरणवळे यांच्यासह सर्व मित्र परिवाराणे त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या राजकुमार भंडारी यांनी सर्व सपोर्ट टीमचे आभार मानले.
0 Comments