Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूरच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीरात 400 च्या वर रुग्णांची नोंदणी

माझं लातूरच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीरात 400 च्या वर रुग्णांची नोंदणी


के वाय पटवेकर

लातूर: दि. 3 - माझं लातूर परिवार आणि विलासराव देशमुख शासकिय विज्ञान संस्थेच्या वतीने 5 डिसेंबर 2021 रोजी आयोजित मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीरासाठी सुमारे 418 नेत्र रुग्णांनी नोंदणी केली आहे. लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग ओपीडी क्र. 4 या ठिकाणी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत गरजू रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केली जाणार आहे. या शिबीराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार असून याप्रसंगी नेत्र विभाग प्रमुख डॉ. उदय मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डोपे यांच्यासह माझं लातूर परिवाराच्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्येष्ठ विधिज्ञ Adv. बळवंत जाधव, Adv. व्यंकट बेद्रे, ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, अशोक चिंचोले या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरासाठी रुग्णांनी नावनोंदणी केली असली तरी त्यादिवशी वेळेत येणाऱ्या गरजू रुग्णांची तपासणी देखील करण्यात येईल अशी माहिती डॉ. मोहिते यांनी दिली आहे. रुग्ण सोडून इतर लोकांनी गर्दी करू नये तसेच शिबिरात येताना मास्क आणि सॅनिटायझर याचा उपयोग करून योग्य अंतर पाळावे. लातूर जिल्ह्यातील जास्तीतजास्त गरजू रुग्णांनी या भव्य मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments