Latest News

6/recent/ticker-posts

अंबुलगा बु येथे सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार सोहळा व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

अंबुलगा बु येथे सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार सोहळा व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक



शिरोळ
:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) दि: 3 - अंबुलगा(बु.) येथील भूमिपुत्र हवालदार बालाजी मधुकर सूर्यवंशी यांनी भारतमातेची 24 वर्ष सेवा करून आज ते सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अंबुलगा बु येथे त्यांचे मित्र मंडळ, आशिष पाटील मित्र मंडळ व गावकरी यांच्या तर्फे संयुक्त सत्कार सोहळा व भव्य आशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील सर्व लहान थोर गावकरी मंडळी,महिला तसेच गावातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम बिरादार गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब मंडळाचे युवक कार्यकर्ते तसेच अशिष पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्कार मूर्ती हवालदार बालाजी सूर्यवंशी यांचा सपत्नीक, सहकुटुंब सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. त्याच्यानंतर गावातील नागरिक गुंडेराव बिरादार यांनी प्रास्ताविक पर भाषण केले. गावातील तरुणांना निर्व्यसनी, प्रामाणिक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच गावातीलअनेक मान्यवरांची प्रबोधनपर भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी तरुणांना मार्गदर्शन व सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंबुलगा बु येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता झल्यानंतर सत्कार मूर्ती हवालदार बालाजी मधुकर सूर्यवंशी यांची ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत गावातील माय माऊली यांनी औक्षण ओवाळून हार,तुरे देऊन सत्कार केला.

Post a Comment

0 Comments