Latest News

6/recent/ticker-posts

कोकळगावच्या पूजा स्वामी चे विप्रो कंपनी साठी निवड

कोकळगावच्या पूजा स्वामी चे विप्रो कंपनी साठी निवड


मदनसुरी:{ (प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी } प्रयत्न, ध्येय आणि जिद्द असेल तर यशाचे शिखर सहज गाठता येते हे दाखवून दिले आहे ग्रामीण परिसरातून शेतकऱ्याच्या कन्येने. निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी शिवानंद पंचया स्वामी यांची कन्या पूजा शिवानंद स्वामी चे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळेत झाले,तर हायस्कुल चे शिक्षण इंदिरा कन्या शाळा किल्लारी येथे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊननिलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले.पुढे त्यांनी जिद्द परिश्रम अभ्यासाच्या जोरावर त्यांनी संगणकशास्त्र व माहितीतंत्र या विषयीचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील कॉक्सीट महाविद्यालयात प्रवेश घेतले. संगणकशास्त्रातील बीसीए, बीएस्सी कॉम्प्यूटर सायन्स व बीएस्सी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या  शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विल्पअंतर्गत (वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम) तयार केला होता, विप्रो येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील कॉक्सिटने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसह त्यांचे एम. टेक चे पुढील शिक्षण करून घेण्यात येणार आहे. पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांची ६० गुणांची पहिली परीक्षा घेण्यात आली होती, ती गणित, इंग्रजी व बुध्दिमत्ता या विषयावर निगडित होती, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची दुसरी परीक्षा म्हणून मुलाखत घेण्यत आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रोफेशनल ज्ञान, तांत्रिक ज्ञान तपासून त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे एम. टेक करून घेण्यात आले आहे. त्यामध्ये अतिशय मेहनत, सतत अभ्यास, करून नामांकित विप्रो कंपनी मध्ये तिची निवड  झाली आहे.तिच्या या निवडींबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य प्रा. डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव, प्रा. तानाजी खरबड, महाविद्यालयाचे अधीक्षक संतोष कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments