Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील ग्रामसभेत वीज वितरण कं. कार्यालय सील करण्याचा ठराव मंजूर

भादा येथील ग्रामसभेत वीज वितरण कं. कार्यालय सील करण्याचा ठराव मंजूर


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं.भादा यांच्याकडे ग्रामपंचायतीची येणे बाकी रक्कम गेल्या अनेक वर्षा ने थकली असून यामुळे ग्रामपंचायत चा विकास थांबला असल्याचे मत नागरिकाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून सदरील थकबाकी वीज वितरण कंपनीकडून वसूल करावयाची असल्यास आता त्या कार्यालयाला कुलुप ठोकले शिवाय पर्याय नाही असे सर्वानुमते एकमत होऊन सध्या त्यांच्याकडे असलेली 13 लाख रुपयांच्या जवळपास थकबाकी त्यांनी मुदतीत नाही भरली तर भादा ग्रामपंचायत कडून वीज वितरण कंपनीला सील ठोकले जाणार असल्याची नोटीस ग्रामपंचायतने सदरील वीज वितरण कंपनीस बजावली आहे. सदर रक्कमेचा भरणा करणे बाबत ग्रामपंचायत ने मागणी बील बजावले आहे. मुदतीत येणे बाकी भरणा न केल्याने वीज वितरण कं. चे कार्यालय सील करून जप्तीची कार्यवाही करण्याचा ठराव दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजीच्या ग्रामसभेत  भादा ग्रामपंचायतने मंजूर केला आहे.

Post a Comment

0 Comments