जि.प.कें. प्रा.शाळा वडमुरंबी येथील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
देवणी:( प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) जि. प. कें. प्रा.शाळा वडमुरंबी तालुका देवणी शाळेतील 100 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली आहेत. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक- कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक भरत निलेवाड, राठोड शेषराव, ढगे रामदास, पाटील विजयकुमार, पाटील संतोष(वर्गशिक्षक विशेष अभिनंदन) रणदिवे प्रवीण यांनी नियोजनपूर्वक अध्यापन केल्यामुळे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली आहेत. त्यात आवाळे साक्षी शिवानंद प्रथम तर स्वामी रामलिंग बसवराज द्वितीय तर आंबेगावे प्रतिमा प्रशांत तृतीय आलेली आहे, भिंगे दत्ता धोंडीबा आणि शेख सुहाना वाहिद हे या परीक्षेत पात्र ठरले आहेत. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे शाळेचे अध्यक्ष अण्णाराव गोविंदराव बीजापुरे तसेच वडमुरंबी चे सरपंच भिंगे ज्ञानोबा तसेच गावातील सर्व नागरिकांकडून सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी बोईनवाड, विस्तारअधिकारी येडले, केंद्रप्रमुख साबणे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.
0 Comments