Latest News

6/recent/ticker-posts

भादा पोलीस ठाण्याचे रुपडे पालटतेय!

भादा पोलीस ठाण्याचे रुपडे पालटतेय!



बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील पोलीस ठाण्याचे रूप पालटणार असून नवे ते भादयाला हवे याप्रमाणे भादा पोलिस ठाण्याचे रुपडे पालटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. औसा तालुक्यातील भादा गाव पोलिस ठाणे औसा तालुक्यामध्ये मोठ्या आकारमानाचे असून या पोलिस ठाण्यावर 45 गावांचा कार्यभार असून या ठाण्याची दक्षिणोत्तर सिमा मोठी असून कर्मचारी अपुरे असल्याचे समजते, भादा पोलीस ठाण्याचा कार्यभार तीन महिन्यापूर्वी घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये बदल घडवून आणल्याची चर्चा आहे तर पोलीस ठाणे इमारत आणि परिसर यामध्येही बराचसा बदल केल्याचे चित्र दिसून येत आहे, यामध्ये सध्या पोलीस ठाण्याचा दर्शनी भाग यामध्ये मुख्य कंपाऊंड आणि मुख्य इमारती समोरील रिकामी जागा या ठिकाणी आमूलाग्र बदल करून रंगी बेरंगी पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण सुरू असल्याचे चित्र पोलिस ठाण्यांमध्ये दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments