केळगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज सहा डिसेंबर निमित्त केळगाव पाटील येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाग्रह येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केळगाव पार्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये चौकाच्या नामफलकस पुष्पहार अर्पण, दीप प्रज्वलित केले व त्या ठिकाणीही अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी कांबळे, बालाजी कांबळे, अनंत कांबळे, लोकमत पत्रकार जावेद मुजावर, भिकाजी कांबळे, माधव कांबले सिद्धार्थ कांबळे, विश्वंभर कांबळे, सचिन सूर्यवंशी, प्रकाश कांबळे, किशोर कांबळे, लक्ष्मण कांबळे, संभाजी कांबळे सह ग्रामस्थ व चिमुकले उपस्थित होते.
0 Comments