निटुर येथील श्री.सादनाथ महाराज मंदिराच्या अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम
निलंगा: तालुक्यातील निटुर येथील पंचक्रोशीतील जाज्वल्य ग्रामदैवत श्री.सादनाथ महाराज मंदिराच्या अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री.नवनाथ बुडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंदिर संयोजक समितिचे प्राचार्य अनिल सोमवंशी, पंकज कुलकर्णी ,विजयकुमार देशमुख ,वि.का. सो.व्हा. चेअरमन दिनकर निटुरे,बाळकृष्ण डांगे, उपसरपंच संगमेश्वर करंजे,नंदकुमार हसबे, सोमनाथ बुडगे,भरत उकळे, गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिनांक 26 एप्रिल ते दिनांक 13 मे दरम्यान महाप्रसादासह सुश्राव्य कीर्तनकाराच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडणार आहे. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कुस्त्यांचा फड रंगणार आहे. गावातील भाविक भक्तांच्या श्रद्धेमुळे अन्नछत्र व नाश्त्याची उत्तम सोय केली आहे. त्याच सोबत सुश्राव्य कीर्तनकार, गायणकार, भजनी मंडळी, टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, संच या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास असणार आहेत. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा. असे पत्रकार राजाभाऊ सोनी यांनी सांगितले.

0 Comments