पुण्याची मेहता पब्लिशिंग हाऊस करणार "माझं लातूर" परिवाराचा ग्रंथभेट देऊन गौरव
लातूर: उदगीर येथे आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे येथील 'मेहता पब्लिशिंग हाऊस' या ख्यातनाम मराठी प्रकाशन संस्थेच्या वतीने येथील "माझं लातूर" परिवाराला ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. माझं लातूर परिवाराचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि समाजपयोगी उपक्रमांची दखल घेत या प्रकाशन संस्थेने माझं लातूरची निवड केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे दिवंगत संचालक स्व. सुनील मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही ग्रंथभेट देण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात शनिवार दि २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक तथा लोकप्रिय कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ग्रंथभेट सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास माझं लातूर परिवाराच्या सर्व सदस्य, साहित्यप्रेमी नागरिक आणि पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मेहता प्रकाशन संस्थेचे अनिरुद्ध पाटील यांनी केले आहे.


0 Comments