भोंग्याचे वादळ संपेना: राज्यभरातून तब्बल 35 मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र !
राजीनामा देणाऱ्या मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश
के वाय पटवेकर
मुंबई: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंग्यांविषयी निर्णय घेण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातील मुस्लिम बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेचे कल्याण मधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यतत्त्वाचा व पदाचा राजीनामा दिला. यानंतर मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई व मराठवाडा भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदअधिकारी यांनी पदाचे तसेच प्राथमिक सदस्यत्वचा राजिनामा दिला आहे. यामध्ये फिरोज खान- मनवासे कार्यकारणी महाराष्ट्र राज्य, मनवासे सरचिटणीस, बशीर सय्यद- मनसे शहरउपाध्यक्ष, लातूर, नदीम सय्यद- मनसे उपशाखा अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 80, अकबर एस. पठाण- मनसे प्रसिद्ध माध्यम महाराष्ट्र राज्य, विभाग अध्यक्ष, समद कुरैशी- जिल्हा सचिव बुलढाणा, दादा देशमुख- अहमदनगर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, रियाज पटेल- जिल्हा सचिव औरंगाबाद, सय्यद सरफराज- मनसे शहर सचिव लातुर, शकिल हुशेन शेख- (खलीफा) शहर संघटक औरंगाबाद, इवान मोमिन बाटा, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य उपचिटणीस, फिरोज पठाण- मागाठाणे विधानसभा, वार्ड क्र. 26 उपशाखा अध्यक्ष, सिराजभाई इनामदार सिन्नर तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, अब्दुल रशीद खान- मनसे उप शहर अध्यक्ष औरंगाबाद, फारूक शेख नादेड उपशहर अध्यक्ष, साजिदभाई शेख- यवतमाल महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, शाहबाज खान- उपशाखा अध्यक्ष प्रभाग क्र 48 मलाड मालवणी, नासिर कुरैशी- मलकापुर शाखा अध्यक्ष, तसलिम शेख- मलकापुर शहर सह सचिव, सय्यद वसीम- मलकापुर शहर अध्यक्ष परिवाहन, ईमाम शाह- मलकापुर शहर उप अध्यक्ष परिवाहन, ऐजाज शेख- मलकापुर शहर सचिव परिवाहन, असलम भाई शेख- उपशहर सगरनेर, युसुफ शेख- सगरनेर तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रमजानभाई शेख- राहुरी तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, जावेद सैय्यद- अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, मोहसिन अब्दुल रहमान खान- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना उप सरचिटणीस अनुशक्ति नगर, साजिद शेख- मनसे उप जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, अलिम- शेख मनसे विभाग अध्यक्ष औरंगाबाद, राजु शेख- मनवासे कार्य अध्यक्ष, अजहर शेख- मनवासे ता.अध्यक्ष देगलुर जि.नांदेड़, शेख चाँद- मनसे शहर संघटक देगलुर जि. नांदेड़, शेख गौस- मनवासे शहर अध्यक्ष देगलुर जि नांदेड़, आरिफ पठान- मनसे ता. उप अध्यक्ष मुखेड जि नांदेड़, फैसल बाहमेद- शहर सचिव देगलुर जि नांदेड़, अब्दुल अजीम अब्दुल करीम- तालुका उप अध्यक्ष चिखली जिल्हा बुलढाणा यांचा यामध्ये समावेश आहे.

0 Comments