भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती औसा विधिज्ञ मंडळाकडून साजरी
बी डी उबाळे
औसा: भारत रत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विधिज्ञ मंडळ औसा या ठिकाणी उत्साहात साजरी केली. यावेळी घटनेच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना सर्व पद्धधिकार्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष बी एम सगट, सचिव सचिन पाटील, सहसचिव नितीन म्हेत्रे कोषाध्यक्ष कुसुमकर तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड. जयराज जाधव,ॲड.अनील मोरे पक्षकार बंधू उपस्तीत होते.

0 Comments