महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय लघुपट महोत्सव उत्साहात
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात महाराष्ट्र महाविद्यालय कॅम्पस फिल्म सोसायटी निलंगा अभिजात फिल्म सोसायटी लातूर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय लघुपट महोत्सवाचे आयोजन दि. 11 व 12 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई येथील सिने समीक्षक व दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात एकूण 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर हे उपस्थित होते तर मंचावर अभिजात फिल्म सोसायटी, लातूर चे सचिव श्याम जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके, उपप्राचार्य डॉ. सी जे कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. पी. गायकवाड आदी उपस्थिती होते.
समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी. जे. कदम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य केळगावकर यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत मंचावर अभिजात फिल्म सोसायटी, लातूर चे उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील देशमुख, आणि अभिजित भूमकर व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. पी. पी. गायकवाड हे ही आवर्जून उपस्थित होते. आदित्य केळगावकर यांनी तरुणांना चित्रपट त्याच्या तांत्रिक बाबींसह अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर चित्रपट ही एक आव्हानात्मक कला असून त्यात रोजगाराच्या कित्येक संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केले. चित्रपटाने रोजगार मिळो अथवा न मिळो परंतु आशय संपन्न व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा चित्रपट पाहिल्याने एक चांगला माणूस घडण्यास मोठी मदत होते असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. सी. जे. कदम यांनी विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव नक्कीच उपयुक्त ठरला असेल अशी आशा व्यक्त केली व या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली असेल असा आशावाद व्यक्त केला. संयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार समन्वयक डॉ. डी. एस. चौधरी व डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. जी. शिवशेट्टे यांनी केले या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील आजादी का अमृत महोत्सव समितीचे सर्व सदस्य तसेच तांत्रिक सहाय्य प्रा. काकडे, सिध्देश्वर कुंभार, नामदेव गाडीवान, दत्ता माने, पवन पाटील, सुहास माने, ज्ञानेश्वर खांडेकर, आणि उमाजी तोडकर यांनी परिश्रम घेतले.

0 Comments