आबासाहेब इंग्लिश स्कूलचा 10 वी चा निकाल शंभर टक्के
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूलचा इयत्ता 10 वी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. टोनकाकाटे अंबादास बाबुराव याने 95.20 टक्के गुण घेवून तालुक्यातून व शाळेतुन पहिला येण्याचा मान पटकावला आहे. शुभम लांडगे याने 94.80 टक्के गुण घेवून तालुक्यातून व शाळेतुन सर्व व्दितीय आला आहे. तर रोहन दारनुळे याने 91.60 टक्के गुण संपादन करुन तालुक्यातून आणि शाळेतून तृतीय आला आहे. माने हरी 90.60 टक्के आणि मनोज बलटे 88.80 टक्के गुण संपादन करुन घवघवीत यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे आबासाहेब इंग्लिश स्कूल ची इयत्ता 10 वी ची हि पहिलीच बॅच आहे. पहिल्याच बॅचचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तसेच आबासाहेब इंग्लीश स्कूल चा निकाल हा तालुक्यात प्रथम लागल्यामुळे संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपनिकर, संस्था सचिव गजानन भोपनिकर, इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुप्रिया कांबळे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments