अजीम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 96.40 टक्के निकाल
बी डी उबाळे
औसा: अजीम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा चा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 मध्ये घेण्यात आली. यामध्ये 96.40 टक्के निकाल लागला आहे. विशेष प्राविण्यासह 105 विद्यार्थी प्रथम श्रेणी,105 द्वितीय श्रेणी,78 उत्तीर्ण श्रेणी,07 उत्तीर्ण श्रेणी झाले आहेत. यामध्ये कुमारी सय्यद अर्शिया 100 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम आली आहे. तर द्वितीय सुलेमान शेख 96.60%,त्रितीय जहागिरदार रियांन 94.80 %अजय चित्ते 94.80% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. यामध्ये संस्थेचे सचिव डॉ.अफसर शेख, अध्यक्ष संजय कुलकर्णी, मुख्याध्यापक निजामुद्दीन शेख, उपमुख्याध्यापक शेख पर्यवेक्षक कोपरे, डॉ.सिद्दिकी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments