Latest News

6/recent/ticker-posts

शेंद सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश बापूसाहेब मोगरगे तर व्हाईस चेअरमन पदी सचिन हारीनंद भदरगे यांची बिनविरोध निवड

शेंद सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश बापूसाहेब मोगरगे तर व्हाईस चेअरमन पदी सचिन हारीनंद भदरगे यांची बिनविरोध निवड


निलंगा: तालुक्यातील शेंद येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक मंडळाच्या 2022-27 च्या निवडणुकीत शेंद सोसायटीची स्थापना करणारे व सोसायटीचे पहिले चेअरमन बापूसाहेब मोगरगे यांचे पॅनल बिनविरोध निवडून आले. माजी चेअरमन बापूसाहेब साहेब मोगरगे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर साहेब व निलंगा तालुका कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात शेंद संस्थेची स्थापना ते आजपर्यंत शेतकरी सभासदांना न्याय देण्याचे काम केले. असल्याने सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात आली आहे.

दि. 12 जून 2022 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी एस. डी. शिवणीचारी व गटसचिव दत्तात्रय डी. लोणारे यांच्या उपस्थितीत शेंद सोसायटीच्या पहिल्या बैठकीत शेंद सोसायटी संस्थापक बापूसाहेब मोगरगे यांचे चिरंजीव रमेश बापूसाहेब मोगरगे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी पंडितराव भदरगे यांचे पुतणे सचिन हारीनंद भदरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस सोसायटीचे नुतन संचालक सुनिल सोनेराव झरकर, आण्णासाहेब रावसाहेब इंगळे, नागनाथ वामनराव पाटील, बाबुराव कडाजी मुगळे, मोहनराव पांडूरंग शेंद्रे, बालाजी बाबुराव भदरगे, दत्तात्रय तुकाराम सोनकांबळे, तुकाराम झटींगा सुर्यवंशी, ललीता व्यंकट भदरगे, शिलुबाई राजकुमार मोगरगे यांची उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या वतीने  नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पंडितराव भदरगे, सरपंच बालाजी मोगरगे, माजी चेअरमन बापूसाहेब मोगरगे, दिलीप मोगरगे, रमेश मोगरगे, सोमेश्वर पाटील, राजकुमार मोगरगे, मोहन भदरगे, सतीष पाटील, नितीन चिरके, गणेश झरकर, रामकिशन सुर्यवंशी, माधव भदरगे, राजु बोडके, बब्रुवान बोडके, बबन भदरगे, अतुल मोगरगे आदींसह सोसायटीचे शेतकरी सभासद व गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments