महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, निलंगा येथील १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निलंगा: येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिल -२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील नंदिणी विजयकुमार हेडे (प्रथम), सुमीत विजयकुमार डोंगरे (द्वितीय), अभिजीत आत्माराम काळे (तृतीय), वाणिज्य शाखेतील वैष्णवी तातेराव धुमाळ (प्रथम), अंजुम सिकंदर शेख (द्वितीय), संजिवनी सौदागर जाधव (तृतीय), कला शाखेतील धनश्री बसवेश्वर कुंभार (प्रथम), सरस्वती राजु लंगोटे (द्वितीय), अक्सा हसनमियाँ शेख (तृतीय), एम.सी.व्ही.सी. शाखेतील पल्लवी अंगद कांबळे (प्रथम), ज्योती धनराज बोयणे (द्वितीय, वेद शाम सिरसले (तृतीय), मार्केटींग शाखेतून पंचशिला मसाजी सुर्यवंशी (प्रथम) गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, निलंगेकर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी संस्था समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अनिल नाबदे, प्रा. सुर्यकांत वाघमारे, प्रा. श्रीकृष्ण दिवे, व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

0 Comments