Latest News

6/recent/ticker-posts

मुगाव सोसायटी च्या चेअरमन पदी कमलाकर शिंदे तर व्हाईस चेअरमन पदी गंगाधर रूबदे यांची निवड

मुगाव सोसायटी च्या चेअरमन पदी कमलाकर शिंदे तर व्हाईस चेअरमन पदी गंगाधर रूबदे यांची निवड 

निलंगा: तालुक्यातील अनेक सोसायट्या बिनविरोध निघाल्या परंतु मुगाव सोसायटी ची निवडणुक अटीतटीची झाली होती. मुगाव सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणुक कॉंग्रेस प्रणित बळीराजा शेतकरी विकास पॅनल चे प्रमुख निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रतिनिधी तथा संगायो समितीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वात सर्व 13 जागा मिळवत विजय संपादित केला होता.

मुगाव सोसायटी ही सहकार चळवळीतील महत्वाची राजकीय सोसायटी असुन आजपर्यंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, पालकमंत्री अमित देशमुख साहेब तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या विचाराचा वारसा जपणारी सोसायटी म्हणून मुगाव सोसायटीकडे पाहिले जाते.

या सोसायटीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक दिनांक 16 जून 2022 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी आर. बी. सगर व गटसचिव गुरुदास पोतदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत सोसायटी च्या चेअरमन पदी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली विभागाचे प्रमुख व्यंकटराव शिंदे साहेब यांचे लहान बंधू कमलाकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी हणमंतवाडी येथील गंगाधर रूबदे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस नुतन संचालक मंडळातील रवि कावळे, सुकुमार धुमाळ, मारूती रकटाटे, दाजीराम वाडीकर, बालाजी शिंदे, लायकपाशा शेख, मुद्रिकाबाई नागमोडे, बबीता पाटील, संगीत कोळेकर, अशोक सुर्यवंशी, विठ्ठल वंटेकर हे उपस्थित होते. यावेळी नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांचा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी निलंगा तालुका संगायो समितीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, जिल्हा बँकेचे प्रमुख वसुली व्यवस्थापक व्यंकटराव शिंदे, चॉदसाब शेख, युवराज पाटील, दत्ता शिरमाळे, सुग्रीव माने, महमद शेख, योगेश पाटील,  गंगाधर शिंदे, नामदेव धुमाळ, रावळाजी शिंदे, मधुकर शिंदे, डिगंबर शिंदे, गोविंदराव महाळ, पांडुरंग महाळ, अंतराम कोळेकर, बापुराव कोळेकर, भागवत महाळ, हणमंत नागमोडे, बब्रुवान वाडीकर, इस्माईल शेख, शामराव रकटाटे, वसंतराव शिंदे, आत्माराम धुमाळ, रमेश पाटील, खमर सय्यद, रियाज शेख, मुक्तार शेख, श्रीमंत जगताप, नागोराव रूपनर, संजय शिंदे, हकानी देशमुख आदीसह गावातील शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments