नूपूर शर्मावर कठोर कारवाई करा,लातुरात वंचित बहुजन आघाडीचा १७ जूनला मोर्चा- सय्यद सलिम यांची पत्रकार परिषदेत माहिती
लातूर: मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान मुहम्मद(स.) पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द काढून मुस्लिम द्वेष व अशांतता निर्माण करणार्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १७ जून रोजी लातूर येथे आजमगोल मशिद ते लोकशाही आण्णाभाऊ साठे चौक दरम्यान दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार असून याच ठिकाणी धरणे व सभा होणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सय्यद सलिम आणि जिल्हा उपाध्यक्ष हमीदभाई शेख यांनी आज १५ जून आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या नूपूर शर्मा यांना तात्काळ अटक करायला हवी होती, मात्र केंद्रातील भाजप सरकार शर्माला पाठीशी घालत असल्याचा अरोप मंजुषाताई निंबाळकर यांनी यावेळी केला. तर नूपूर शर्मावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे अशी हिम्मत करणार नाही. आम्ही शांतीचा संदेश देत आहोत. असे मत हमीदभाई शेख यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष जगदिश माळी, तात्याराव वाघमारे, सचिन लामतूरे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई निंबाळकर, शहराध्यक्ष सुजाता अजनीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


0 Comments