जर आमदार पळवून नेला हो नेला.. महाराष्ट्र चोरीला गेला...
बी डी उबाळे
औसा: सध्याची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती ही एकदम अस्थिर झाली असून या परिस्थितीवर सध्या सोशल मीडियावर आणि औसा तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात महाराष्ट्र चोरीला गेला... हे गीत मोठ्या प्रमाणात गाजत आहे. जर आमदार पळवून नेला हो नेला.. महाराष्ट्र चोरीला गेला शिवरायांचा आंबेडकरांचा हो प्रांत त्याला राहिली नाही क्रांत थोरा मोठ्यांचा वारसा मेला हो मेला.. महाराष्ट्र चोरीला गेला आपला महाराष्ट्र सांभाळा.. असे शाहीर रोहित भारदे, यांनी गायिलेले हे गीत आणि प्रस्तुत शंकर भारदे हे गीत सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात गाजत आहे.

0 Comments