भादा येथे विविध भागात पाण्यामुळे रस्ते झाले चिखलमय
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे गटारी सांड पाण्याच्या नाल्या नसल्याने नागरिकांची सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे-फिरणे मोठे कठीण झाले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत कडून विविध भागांमध्ये नाल्या काढणे आवश्यक आहे.
तर सध्या शिवाजीनगर भागातील कोरंगळा रस्त्यालगतच्या जयभीम नगर वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात चिखलमय रस्ते दल दल युक्त झाले असून नागरिकांना आणि शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक यांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
कारण या ठिकाणी काळ्या चिकन मातीचा स्तर या रस्त्यावर असल्याने चिखलमय झाला आहे.
यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना चालणे कठीण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तरी या रस्त्यावरती मुरूम अस्तरीकरण करणे आवश्यक असल्याचे मत या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
● या रस्त्यावर करण करण्यासाठी ज्या ठिकाणी किती ट्रॅक्टर मुरूम आवश्यक आहे.याचे नियोजन लवकरच केले जाईल आणि रस्ता दुरुस्त केला जाईल असे भादा येथील ग्रामविकास अधिकारी एम व्ही सूर्यवंशी यांनी सदरील प्रतिनिधींशी कळविले आहे.

0 Comments