Latest News

6/recent/ticker-posts

आंबेगाव सोसायटी च्या चेअरमनपदी प्रमोद मरूरे यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड

आंबेगाव सोसायटी च्या चेअरमनपदी प्रमोद मरूरे यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड 

निलंगा:(दि.26) तालुक्यातील आंबेगाव, अंबुलगा मेन ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची 2022-27 निवडणुक दि. 5 जून रोजी झाली होती. निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली बैठक दिनांक 26 जून 2022 रोजी निवडणुक निर्णय अधिकारी एन बी शेख व गटसचिव गोपाळ जांभळदरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत मागील चार पंचवार्षिक कार्यकाळात चांगली कामगिरी करणारे प्रमोद दासराव मरूरे यांची पाचव्यांदा चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी व्यंकट प्रल्हाद शिंदे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला आत्माराम जनार्धन काळे, अमर आण्णाराव माने, वसंत नामदेव शिंदे, वाळीव गणपती पवार, हरिभाऊ महादु शिंदे, संग्राम गंगाराम कदम, सौ. सत्यभामा विजयकुमार जावळे, सौ. ललिता हरिश्चंद्र लोकरे, बब्रुवान व्यंकटराव पांचाळ, गोविंद नारायण सुरवसे, भगवंत गणपती कांबळे हे नुतन संचालक उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांचा सत्कार करण्यात आला.

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांचे मार्गदर्शन व आशीर्वादामुळे लाखात कर्जवाटप असणारी सोसायटी आज कोटीवर नेहली व शेतकरी सभासदाची बँकेची सर्व कामे प्रामाणिकपणे केल्याचे चेअरमन प्रमोद मरूरे यांनी यावेळी सांगत सर्वांचे आभार मानले.

यावेळी बसपुर चे चेअरमन गंगाधर चव्हाण, गणेश देशमुख, माधवराव पाटील, हरिश्चंद्र तोंडवळे, विजयकुमार जावळे, नंदकिशोर देशमुख, प्रविण मरूरे, उध्दव जाधव, वसंत मरूरे, संजय जावळे, विक्रम मरूरे, चंद्रकांत तोंडवळे, सुभाष शिंदे, सोमनाथ बन, चॉद शेख, नेताजी शिंदे, दिलीप शिंदे, रमेश पाटील, दिगंबर मरूरे, राम पाटील, नरसिंग तांबेकर, सुरेश जावळे, विक्रम लोकरे आदीसह अंबुलगा मेन व आंबेगाव येथील शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments