घरोघरी नारळाचे रोपे भेट देऊन नवोपक्रमाणे केला लग्न वाढदिवस साजरा;सेलुतील जाधव कुटुंबाचा आदर्श मानवतावादी उपक्रम
बी डी उबाळे
लातूर: सेलू गावचे रहिवाशी रवी वामनराव जाधव यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त सेलू( बु) येथे "एक घर ,एक वृक्ष" नारळाचे रोपटे(झाड)प्रत्येक घरी देऊन वाढदीवस साजरा करण्यात आला.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हस्ते नारळाचे व्रक्ष देऊन एक चांगला उपक्रम राबवीला असेच सामाजिक कार्य करण्याची आवड असणारे आणि व्यवसायाने सराफ असणारे रवी जाधव कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाहीत तरीही सामाजिक कार्याची आणि मानवतावादी विचाराने प्रेरित झालेले जाधव कुटुंब मोठे सामाजिक कार्य करणारे आणि मानव कल्याणाचा पुरस्कार करणारे असे असल्याचे समजते यामुळे त्यांनी त्यांच्या लग्न वाढदिसानिमित 250 नारळ हे फळझाड(रोप)वाटप करून आपला लग्न वाढदिवस साजरा केला. अशी माहिती सोशल मीडियावर त्याच गावचे रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते पवन कांबळे यांनी दिली.
0 Comments