जयक्रांती काॅलेज मध्ये १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अॅनिमल हजबंडरी & डेअरी टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रम.
लातूर: जयक्रांती काॅलेजमध्ये १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता MCVC अभ्यासक्रमातील दोन वर्षाचा अॅनिमल हजबंडरी & डेअरी टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रम शिकवला जातो, या अभ्यासक्रमात किमान २० व कमाल ४० विद्यार्थी संख्या असते. हा अभ्यासक्रम पुर्ण करणार्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची सुविधा. कनिष्ठ महाविद्यालयात मिळून जाते. सध्या देशातील पारंपारीक शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी बेरोजगार राहण्यापेक्षा व्यावसाय शिक्षण घेवून, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या, सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या, उच्च शिक्षण स्वयंरोजगार, स्वतःचा व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडणे हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास कमी कालावधीत यशाची मोठी उंची गाठण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्य, आवडी आणि क्षमतांनुसार फील्ड निवडणे खूप महत्वाचे आहे. व्यावसाय शिक्षणाबरोबर पुढिल शिक्षणाची संधी उपलब्द असते १२ पास नंतर शैक्षनिक संधी. BA, BSc, BCA, BSW, BVoc, Food Technology यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक - येथे कृषी अधिष्ठिन आणि BSc Agri साठी प्रवेश घेता येतो, हाॅटेल मॅनेजमेंट & केटरींग, ट्रॅव्हल & टूरीझाम, पर्यटन, नर्सिग,( ANM), DMLT या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. अशी माहिती प्रा. गुजर एस के यांनी दिली.

0 Comments