सामाजिक बांधिलकी जोपासणारा शिंदे परिवाराचा उपक्रम- ॲड.प्रमोद जाधव
रेणापूर: दिवंगत दासू शिंदे यांच्या ६ व्या स्मृतीदिनानिमित्त जि.प.प्रा.शाळा, बिटरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेट ब्रॉडबँड सेवेचा लोकार्पण सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन सत्कार, गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व महापुरुषांचे चरित्र ग्रंथ वाटप करून शिंदे कुटुंबीयांनी समाजा समोर व गावकऱ्यां समोर एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन रेणापूर तालुका कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा डीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांनी केले आई वडील हयात असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक मुलं समाजात, कुटुंबात पहायला मिळतात पण प्रा.शिंदे यांनी हयात असताना आईवडीलाच्या अरोग्याची काळजी घेतली, त्यांची सेवा केली तसेच त्यांच्या कष्टाची, श्रमाची जाणीव ठेवून त्यांच्या पश्चात सामाजिक बांधिलकी जोपासून गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करून दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन गावातील लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.संजय शिंदे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.मोहनराव अभंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माणिक सोमवंशी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब जाधव, पोलिस पाटील रावसाहेब पाटील, सरपंच महेंद्र पाटील, केंद्र प्रमुख गोविंद पुरी, केंद्रीय मुख्याध्यापक बिभीषण जाधव, व्यंकोबा खंदाडे, इ.प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ.शिंदे म्हणाले की, हा दिवस माझ्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे स्मरण करणारा दिवस आहे.
आपल्यावर ज्या शाळेने संस्कार केले ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो त्या शाळेला, गावाला कधीही विसरायचे नसते तर सामाजिक बांधिलकी जोपासून मदत केली पाहिजे मी तर फुले -शाहू -आंबेडकरी विचार प्रमाण माणून काम करणारा आंबेडकरी चळवळीतीला कार्यकर्ता आहे. बांधिलकी जोपासने हा माझा स्थायी भाव आहे मी काल मदत केली मी आज मदत करतो आहे आणि उद्याही मदत करणार असे विचार व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आले, इंटरनेट ब्रॉडबँड सेवेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र लोदगेकर यांनी केले, या कार्यक्रमाला फकिरा ब्रिग्रेडचे नंदू राऊत, संतोष गायकवाड, संजय विरूळे, शरद धबडगे, सूर्यकांत कदम, गोविंद धबडगे, किशोर कसबे, गहिनीनाथ मस्के, ऋषिकेश भडंगे, मुख्याध्यापक हिरामण साळी, दशरथ वाकडे, माणिक पवार श्रीम.केदाबाई वनीस, शोभा कांबळे, दैवशाला सब्बनवाड यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद कटके यांनी केले तर आभार श्री माणिक पवार यांनी मानले.


0 Comments