Latest News

6/recent/ticker-posts

दैनंदिन जीवनात योगा ही काळाची गरज- सौ.डॉ.राहत शेख

दैनंदिन जीवनात योगा ही काळाची गरज- सौ.डॉ.राहत शेख

बी.डी.उबाळे

औसा: सद्या दैनंदिन धावपळीच्या युगात ताणतणावा पासून मुक्ती मिळावी व आरोग्य चांगले रहावे म्हणून जागतिक योगा दिनानिमित्त शतायुषी  योगा क्लास व निसर्गोपचार केंद्रामार्फत महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिरासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी योग प्राणायाम व निसर्गोपचार याविषयीची सखोल माहिती देण्यात आली. यात निरोगी जीवनासाठी निसर्गोपचार व आयुर्वेद किती आवश्यक बाब आहे त्याचप्रमाणे योगा हा जीवनाचा अविभाज्य अंग बनले पाहिजे असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ञ सौ.डॉ. राहत शेख यांनी केले.

यावेळी योग प्रात्यक्षीके, प्राणायाम घेण्यात आले, व योगाचे महत्त्व महिलांना पटवून दिले. शेवटी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या आरोग्य विषयीच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. शेख यास्मिन महेबुब, सौ. कल्पना दुरुगकर, सौ. कुरेशी गौसिया हमीद, तबस्सुम सय्यद यांनी भाग घेतला व आरोग्याच्या सर्व समस्या योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाने कशा दूर केल्या जाऊ शकतात ? हे डॉ. राहत शेख यांनी यावेळी समजावून सांगितले.

Post a Comment

0 Comments