संविधानाच्या प्रस्ताविकेवर-preamble(व्याख्या,स्पष्टीकरण,हेतू) वर सोपे व मनोरंजनात्मक पुस्तक करायचे, सहभाग घ्या- इ झेड खोब्रागडे यांचे आवाहन
बी डी उबाळे
लातूर: संविधानाची प्रास्ताविका Preamble हे संविधानाचे ध्येय व उद्दिष्ट आहे.संविधानाचा आत्मा आहे.संविधानाचे ओळख पत्र आहे. संविधानाचा अविभाज्य अंग आहे. प्रस्ताविकेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजला तर संविधानिक मूल्ये शिकणे, शिकविणे, समजणे, अंगीकृत करणे, रुजवीने आणि आचरणात आणणे सोपे होऊन जाते.
संविधानाच्या प्रास्ताविकेचे रोज वाचन नागपूर जिल्यातील शाळांमधून 2005 पासून सुरू झाले. 2013 च्या दि 4 फेब्रुवारी च्या शासन निर्णय नुसार राज्यातील सर्व शाळांमधून रोज वाचन करण्याचे आदेश आहेत. इतर ही कार्यक्रमाचा उल्लेख या शासन निर्णयमध्ये आहेत. शालेय शिक्षण विभागावर जबाबदारी आहे. या शासन निर्णय(GR) ची अमलबजावणी कशाप्रकारे होत आहे, हे शिक्षणाधिकारी यांनाच माहीत असणार. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून संविधान जागृतीचे कार्यक्रम गांभीर्याने घेतले जात नाहीत असा सूर ऐकायला मिळतो.
संविधान प्रस्ताविकेचे वाचन करीत असताना, वर्ग 5 वी व पुढील वर्गात शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची प्रास्ताविका-preamble नीटपणे, सोप्या शब्दात, रुचेल, समजेल गोडी निर्माण होईल, अशा मनोरंजक पद्धतीने गोष्टी रूपाने समजावून सांगण्याची गरज आहे. त्यासाठी असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. सुरुवातीला प्रस्ताविकेतील प्रत्येक मूल्य शब्दावर एक-एक लेख 500 शब्दापर्यंत तयार करायचा आहे. इच्छुकांकडून लेख प्राप्त झाले की जो लेक उत्कृष्ट आहे. अशा लेखांचे एक पुस्तक तयार संविधान फौंडेशन तयार करेल. उत्कृष्ट लेख देणाऱ्यांचा सन्मान केला जाईल.
शाळा सुरू झाल्यात. वाचन सुरू झाले. वाचनाचे पुढे जाऊन समजणे व त्यासाठी शिकणे शिकवणे, त्यासाठी साहित्य निर्माण करणे आवश्यक आहे. प्राथमिक-माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणारे शिक्षक तसेच इतर इच्छुक यांना विनंती आहे की त्यांनी त्यांना आवडते त्या मूल्यावर लेख, धडा 500 शब्दपर्यंत, चित्रमय लिहावा.
प्रस्ताविकेचा जवळपास 21 शब्दमूल्ये आहेत. एका शब्द मूल्यावर किमान 5 शिक्षकाकडून लेख, धडा अपेक्षित आहे. इच्छुक शिक्षकांनी आपली नावे व लेख विषय आमच्याकडे नोंदवावा. आपण online चर्चा करून आखणी करू या. इतरही इच्छुक सहभाग घेऊ शकतात. संविधानाच्या Preamble वर पुस्तक तयार करू या. आपले प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. संपर्कासाठी:- डॉ.महेंद्रकुमार मेश्राम: 9975665862, गौतम मेश्राम: 9421731624, दीपक निरंजन: 8879386676, दिगंबर गोंडाने: 9112654735
इ. झेड. खोब्रागडे(भाप्रसे नि.) संविधान फौंडेशन, नागपूर Mobile: 9923756900 दि. 24 जून 2022 संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments