Latest News

6/recent/ticker-posts

देवराजबुवा मित्र परिवार, पुणे ग्रुप यांच्या वतीने शिरोळ येथे देवराजबुवा मंदिर परिसरात वृक्षारोपण

देवराजबुवा मित्र परिवार, पुणे ग्रुप यांच्या वतीने शिरोळ येथे देवराजबुवा मंदिर परिसरात वृक्षारोपण

शिरोळ:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) देवराजबुवा मित्र परिवार, पुणे ग्रुप हे मुळचे शिरोळचे पण कामानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले तरुण एकत्र येऊन गावाचा विकास व्हावा,सुशोभीकरण व्हावं असा विचार करुन आज शिरोळ चे ग्रामदैवत देवराजबुवा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

    नाती आणी वृक्ष दोन्ही सारखेच असतात,लावुन विसरल्यावर दोन्ही सुकतात अशा प्रकारची टॅग लाईन वापरुन फक्त झाडे न लावता ते जगवण्यावर पण भर दिला पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे.

    देवराजबुवा मित्रमंडळ, पुणे ग्रुप यांचे प्रतिनिधी राजकुमार रावजादे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.कार्यक्रमास शिरोळचे सरपंच गौतम सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी वृक्षारोपण केले तसेच या कार्यक्रमाला संजय कांबळे, नारायण धडे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सुरेश धडे आणी गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments