Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तहसीलदार भाद्यात

राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तहसीलदार भाद्यात

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे दिनांक 27 जून 2022 रोजी राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना गावांमध्येच प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दि 23 जून 2022 रोजी औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी भादा गावास भेट दिली.

यावेळी भादा गावातील तलाठी कार्यालयांमध्ये त्यांचे स्वागतास उपसरपंच बी एम शिंदे,ग्रामपंचायत सदस्य तानाजी गायकवाड,योगेश लटूरे,तलाठी राम दुधभाते आदी उपस्थित होते.

या नंतर भादा ग्रामपंचायत कार्यालयाला तहसीलदार सूर्यवंशी यांनी भेट दिली आणि राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांना कोणतेही अडचण किंवा समस्या येऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि 27 जून रोजी सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र योग्यरीत्या मिळावे याकरिता नियोजन केले असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments