महाराष्ट्र विद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, निटूर येथे जागतिक योग दिन उत्साहात
बी डी उबाळे
निलंगा: तालुक्यातील निटूर येथे जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक तथा रुरल अँड अर्बन योगा असोसिएशन, लातूर चे अध्यक्ष के.वाय.पटवेकर यांनी निटुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व महाराष्ट्र विद्यालय मध्ये उपस्थित रुग्णांना, कर्मचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, योगाचे धडे दिले. जागतिक योग दिन मंगळवार दिनांक 21 जून 2022 रोजी निटूर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पटवेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसह आरोग्य केंद्रातील तपासणीला उपस्थित असलेल्या रुग्णांना योग दिनानिमित्त शारीरिक बलवानता साठी आणि मानसिक बळवांनतासाठी योग अभ्यासाची धडे दिले आणि त्या योगाभ्यासातून होणारे शारीरिक फायदे आदी विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी मोरे, डॉ. पी.व्ही.पवार/मोरे दाम्पत्य व त्यांचे कर्मचारी श्रीमती एस.एन.राउत, श्रीमती सावककर, प्रशांत चौधरी, सुमित कांबळे, सिद्धेश्वर बाडगंडी, अर्जुन आपटे,गिरे, माने सह रुग्ण, जिल्हा परिषद शाळेतील योग पट्टू कार्तिक माळी, शिवहार माळी महाराष्ट्र विद्यालयाचे एन.एम पाटील, एच.एन.भोयबार, एम.जी.नाईकवाडे, आर.एन.सूर्यवंशी, ए.आर.देशमुख, आर.एम.निटुरे, व्ही.व्ही.जाधव उपस्थित होते.
सदर शाळेची विद्यार्थिनी योग पट्टू- श्रुती बसवणे सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सूत्रसंचालन श्रीमती एस.एन.राउत यांनी केले तर आभार आरोग्य अधिकारी एस.बी मोरे यांनी मानले. महाराष्ट्र विद्यालय येथील सूत्रसंचालन एन.एम पाटील यांनी केले तर आभार एच.एन.भोयबार यांनी मानले.




0 Comments