सर्व शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत, शिवसेना व युवासेना निलंगा यांनी घेतली शपथ.
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शिवसेना परिवारातील काही आमदार फुटून गेल्यामुळे शिवसेना व उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ निलंगा शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा व आम्ही सर्व शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहोत अशी घोषणा केली व असच कायम शिवसेनेच्या सोबत राहू अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे घेण्यात आली. शिवसेनेने असे अनेक वादळ सहन केली अशा वादळातून पुन्हा नवीन अस्तित्व तयार केल गेल. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, तालुका संघटक शिवचरण पाटील, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, शहर संघटक हरिभाऊ सागरे, उपशहर प्रमुख माधव नाईकवाडे, शाहूराज फट्टे, यशवंत बसपुरे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख, महिला आघाडी तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, पांढरे मॅडम, सर्कलप्रमुख मंगला कांबळे, व्यापार आघाडीचे उपजिल्हाप्रमुख उमेश सातपुते, तालुकाप्रमुख प्रसाद मठपती, आडत व्यापारीप्रमुख किशन व्यंकटराव मोरे, शहरप्रमुख जमील शेख, उपशहर प्रमुख स्वप्निल लाटे, अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुख लाईक पाशा शेख, उपतालुकाप्रमुख मेहबूब शेख, शहर प्रमुख बाशा कुरेशी, किरण कानडे, कन्हैया पाटील, नागनाथ बाबळसुरे, अर्जुन नेलवाडे, गोपाळ हिबारे, खंडू सरतापे, गणेश सरतापे, राहुल बिराजदार, बजरंग कांबळे, अनिल आरीकर, शिवाजी पांढरे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.


0 Comments