Latest News

6/recent/ticker-posts

विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालकांचा रसिका महाविद्यालयात सत्कार

विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालकांचा रसिका महाविद्यालयात सत्कार



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे आणि गोविंदराव भोपनिकर यांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडून सदरील सोसायटीच्या चेअरमन पदी रतन गरड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रसिका महाविद्यालयात गोविंदराव भोपनिकर हस्ते चेअरमन रतन गरड, व्हाइस चेअरमन माधव पाटे, संचालक छान विठलराव मुराळे, कमलाबाई पांडुरंग व्यंजने, माधव दौलतराव कोळेकर, किशन विठल पाटील, रामराव निवृत्ती धनासुरे, सीताराम बापु रणदिवे, मनोहर तुळशीराम पाटील, प्रतिष्ठित नागरिक गोविंदराव भिमराव गरड तसेच माजी सरपंच बापुराव ज्ञानोबा येनगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि सोसायटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच भोपनी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल देवणी खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गोविंदराव गरड यांच्या हस्ते गोविंदराव भोपनिकर साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन भोपनिकर, प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे पाटील, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, वार्ताहर बालाजी टालीकोटे, विक्रम गायकवाड, गिरीधर गायकवाड व नरसींग सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments