Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ विवीध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

शिरोळ विवीध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व


सलीमभाई पठाण

निलंगा: शिरोळ,वांजरवाडा,गिरकचाळ सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत प्रताप पाटील यांच्या शेतकरी ग्रामविकास पॅनल ने निर्विवाद वर्चस्व मिळवले.अटीतटीच्या लढतीत देवराजबुवा पॅनलचा त्यांनी पराभव केला. मागच्या यशाचा पाढा प्रताप पाटील यांच्या पॅनलने या निवडणुकीत पण कायम ठेवला आहे. विजयी उमेदवारामध्ये प्रताप यशवंतराव पाटील, गुंडेराव हणमंतराव जाधव, देविदास रंगराव जाधव, विजयकुमार शिवाजीराव पाटील, दयानंद सुर्यभान जाधव वडगावे, सुधीर लिंबराज पाटील, अनंत दत्तु धडे, शाबेराबी छोटु सय्यद, शकुंतला गंगाधर गड्डे पाटील, गिरी रतन शिवरामगीर, नागमोडे मारुती सतबा, उमाटे गुंडेराव मारुती यांचा समावेश आहे. देवराजबुवा पॅनलचे पॅनलप्रमुख इंद्रजीत वामनराव जाधव हे एकमात्र विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचं गावकऱ्यांनी अभिनंदन केलं आणी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विजयी उमेदवारांनी वंदन करून आतिशबाजी करत विजयाचा गुलाल उधळला. या विजयोत्सवात प्रसाद जाधव, मारोती जाधव, जलील सय्यद, बाळु जाधव, युवराज शिंदे आदि सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments