Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची कोअर कमिटी जाहीर;लातूरचे सी.के.मुरळीकर यांचाही समावेश

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची कोअर कमिटी जाहीर;लातूरचे सी.के.मुरळीकर यांचाही समावेश

लातूर: दि.२०राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महासंघाच्या कार्याचा विस्तार व्हावा, संघटन वाढावे व कामात सुसुत्रता यावी यासाठी २१ जणांची एक कोअर कमिटी स्थापन केली असून, त्यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के.मुरळीकर (लातूर)यांचा समावेश करण्यात आला आहे.

यासंदर्भात जारी केलेल्या एका पत्रात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी म्हटले आहे, महासंघाचे काम ग्रासरुटपर्यंत वाढविण्यासाठी व संघटनेच्या कोअर कमिटी स्थापन करण्यात येत असून, यात बबनराव घोलप, भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र आवसारे, पंढरीनाथ पवार, भानुदास विसावे, ज्ञानेश्‍वर कांबळे, राजेंद्र राजूस्कर, आनंद गवळी, शशिकांत सोनवणे, उमाकांत डोईङ्गोडे, माधव गायकवाड, डॉ.शांताराम कारंडे, लिलाधर कानोडे, गजानन भटकर, ङ्गुलचंद मालाधरी, गौतम बळवंते, पंढरीनाथ तांबटकर, भरत भरतुने, सी.के.मुरळीकर, गोपालसिंह बच्छीरे, राजू नेटके या २१ जणांचा समावेश आहे. दरम्यान कोअर कमिटीत संंस्थापक अध्यक्ष घोलप यांनी संधी दिल्याबद्दल लातूरचे सी.के.मुरळीकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments