नुपूर शर्मास अटक करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन
शेख बी जी.
औसा: दि.15 इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद(स.) पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या नुपुर शर्मा, टाइम्स नाऊ टीव्ही चॅनल, नवीन जिंदल यांच्यावर कायदेशीर कारवाई करा व तसेच रांची मध्ये आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या मोहम्मद शाहीद यांच्या परिवारास न्याय द्यावे, बेकायदेशीर बुलडोजर द्वारा निवासी घरे पाडणाऱ्या पासून अल्पसंख्याक समाजास संरक्षण मिळावे. याबाबत औसा मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि. 15 जून 2022 बुधवार रोजी औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले. या निवेदनाचे सविस्तर वृत असे की, नुपुर शर्मा, नविका कुमार सोबत टीव्ही शोमध्ये तसेच नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद( स.) पैगंबर यांच्या इस्लाम धर्माबद्दल अपमानास्पद, निंदनीय वक्तव्य केले मुस्लिम समाजाचे आदरणीय प्रेषित मोहम्मद(स.) पैगंबर यांचा अपमान केला. संपूर्ण मुस्लिम समाजाचा अपमान केला. निंदा-नालस्ती केली. त्यांनी वाईट शब्दांचा प्रयोग केला त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, सदर घटनेचा निषेध होत असलेल्या आंदोलनामध्ये रांची येथे झालेल्या घटनेत मोहम्मद शाहिद या आंदोलन करणाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या परिवारास न्याय देण्यात यावा. तसेच देशात बेकायदेशीर सूडबुद्धीने अल्पसंख्याक समाजाची घरे बुल्डोजरद्वारे पाडण्यात येत आहेत. त्यांना बेघर केले जात आहेत ते त्वरित थांबण्यात यावे व अल्पसंख्याक समाजास संरक्षण देण्यात यावे. तरी आम्ही सर्व समाज बांधव अशा प्रकारे समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर समाजद्रोही वरती योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी आंदोलनात शहीद झालेल्या मोहम्मद शाहीद यांच्या कुंटुबियास न्याय द्यावे. यामागणीसाठी औसा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन दिले. यावेळी या निवेदनावर माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, शेख शकील, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, सय्यद अजहर हाशमी,मोईज अली इनामदार, अँड मजहर पटेल, इल्हाज पटेल, नौशाद पटेल, शेख समिर, शेख सत्तार, खाजा शेख, सुजाहात अली काझी, शेख जाकीर, सय्यद मुस्तफा वकील इनामदार, शेख जावेद नजीरसाब, म.युनुस चौधरी, अजहरोद्दीन पटेल, अविनाश टिके, गोंविद जाधव, संगमेश्वर उटगे, संतोष औटी, गणेश साळुंके, गजेश्वर शिंदे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments