Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

महाराष्ट्र महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण



निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर प्राचार्य डॉ माधव कोलपूके यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक करत असताना रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर व तसेच त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला. 

कृषीदिनाचे औचीत्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कामगार कल्याण विभाग निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कडूनिंब, पिंपळ, बहावा, करंज, चिंच, आवळा, जांभूळ अशा विविध वृक्षांची एकूण ७५ रोपे महाविद्यालय परीसरात लावण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार,डॉ. विठ्ठल सांडूर, धनंजय जाधव, प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. भगवान वाघमारे, डॉ. मिलींद चौधरी, डॉ. बालाजी गायकवाड, प्रा. गोविंद शेंडगे, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. गोपाळ मोघे, प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. दत्तात्रय पवार, प्रा. गरड, प्रा. तोंडवळे, दिलीप सोनकांबळे, कामगार कल्याण विभागाचे श्री संगमेश्वर जीरगे, आरिगिरी मॅडम, मनोज यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments