गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटा सोसायटीकडून सन्मान
बी डी उबाळे
औसा: ग्रामीण भागामध्ये घरची आणि शेती कामे करून विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या कष्टयातून शिक्षण घेतात असे हे परखड परिश्रम करूनही चांगले गुण घेऊन ग्रामीण भागातील ही विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुंणवत्तेमध्ये इतर शैक्षणिक सोई सुविधा नसतानाही शहरी विध्यर्थ्यांना मागे टाकत आहेत.
याकरिता आशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भेटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.भेटा.यांच्या कडूंन भेटा येथील इयत्ता आठवी, दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा दि 3 जुलै 2022 रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी चेअरमन श्रीकृष्ण माने, व्हा चेअरमन, सदस्य तसेच भेटा गावचे सरपंच शाम शेळके, उपसरपंच दगडू ढोले, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार श्रीधर माने, विष्णू ढोले आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिक शिक्षण प्रेमी विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments