जिल्हा परिषद शाळा केळगावचे शिक्षक विठ्ठल चांबारगे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
केळगाव: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विठ्ठल चांबारगे यांना नुकताच राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार लातूर येथे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला
शाळेवर योग्य अध्यापन व विद्यार्थ्याला शिस्तबद्ध करण्यासाठी त्यांचे मोलाचे कार्य असते त्याबद्दल त्यांचा आज केळगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळेमध्ये शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी केळगाव गावचे माजी सरपंच शकील पांढरे, किसन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक भंडारे, रावण कांबळे प्रकाश सूर्यवंशी, रमजान सय्यदपुरे, मुजीब डाळिंबकर, जोहर पांढरे, शिवाजी राठोड, मोमीन मॅडम, सय्यद मॅडम, काळगापुरे मॅडम,पांचाळ, भिकाजी काळे, शेंद्रे सर, पांचाळ सर सह ग्रामस्थांनी पुरस्कार भेटल्याबद्दल आदर्श शिक्षक विठ्ठल चांबारगे यांचा केळगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


0 Comments