भादा येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्ष रोपन,15 पुस्तकाचे प्रकाशन
बी डी उबाळे
औसा: भादा ता.औसा येथे राज्याचे माजी राज्यमंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते
जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण, संगणक कक्षांचे उद्घाटन व कवी भारत सातपुते यांच्या 15 पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी करण्यात आले. यानंतर भादा येथील कन्या प्रशालेसाठी जागा उपलब्ध आहे परंतु निधी उपलब्ध नसल्याने इमारतीचा मोठा भीषण प्रश्न असल्याचे कवी भारत सातपुते यांनी सुचित केल्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या शाळेसाठी 49 लाख रुपये हे 22 खोल्या बांधण्यासाठी लवकरच उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन जाहीररीत्या दिले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, प्रा.सुधीर पोतदार, दत्तोपंत सूर्यवंशी, श्याम भोसले, सचिनजी दाताळ, प्रमोद जाधव, सरपंच मिनाबाई दरेकर, चेरमन दत्तकुमार शिंदे, उपसरपंच बी एम शिंदे, रविशंकर आर पाटील ग्राम विकास अधिकारी एम व्ही सूर्यवंशी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, शाळेतील शिक्षक, गावातील नागरीक, पालक आदि मान्यवर उपस्थित होते.



0 Comments