मालपाणी कॉम्प्लेक्स परिसरातील कचरा उचलण्यासाठी मनपा आयुक्तांना आम आदमी पार्टीने दिले निवेदन
लातूर: शहर परिसरातील मालपाणी कॉम्प्लेक्स समोरील बाजूस मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते स्वच्छ करण्यासाठी आम आदमी पार्टीने लातूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले
तसेच लातूर शहर भागातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे तेही स्वच्छ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
तर सविस्तर वृत्त असे की लातूर महानगरपालिकेच्या हद्दीतील मालपाणी कॉम्प्लेक्स समोरच्या रस्त्यावर रात्री बेरात्री हॉटेल चालकाकडून टाकण्यात येणाऱ्या घाणीमुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे मालपाणी कॉम्प्लेक्समधील सर्व दुकानदार, तेथे येणारे विद्यार्थी, प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात या समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर तेथील दुकान चालक ,नागरिकांनी व आम आदमी पार्टी पक्षाने संयुक्त पणे महानगरपालिका उपाआयुक्तांना या समस्या बद्दल निवेदन दिले आहे. तर मनपा प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जाईल अशी ही ग्वाही यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनपा उपायुक्त्यांकडून देण्यात आली .
यावेळी निवेदन देताना आम आदमी पक्षाचे कार्याध्यक्ष अमित पांडे, आप युवा आघाडी राज्य सदस्य शाम माने, लातूर मनपा संघटक शफी चौधरी, लातूर मनपा प्रचार प्रमुख दीपक काणेकर व तेथील दुकानदार व नागरिकांचा सहभाग होता.


0 Comments