Latest News

6/recent/ticker-posts

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे दि. 29 जुलै रोजी स. ७:१५ वा. ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरामध्ये अभिषेक, ७:४० वा. सिंदखेड रोड शेतामध्ये दादाबाग येथे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन व आज्जी मातोश्री वत्सलाबाई पाटील यांच्या समाधीचे दर्शन, स. ८:०० वा. सय्यद पिरपाशा काद्री दर्गा रहे.येथे चादर अर्पण , ८:३० वा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन, स. ९:०० वा. हजरत दादापीर दर्गा रहे. येथे चादर अर्पण, स. ९:३० वा. उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप, स. ९:५० वा . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन, स. १०.१५ वा . महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण, स. १०:३० वा. वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण, स. ११:०० वा. अशोक बंगला येथे बाहेरगावाहून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या शुभेच्छांचा स्विकार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दयानंद चोपणे व माजी नगरसेवक सिराज देशमुख, विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, अजित नाईकवाडे, प्रकाश बाचके, अजगर अन्सारी, अशोक शेटकार, नवनाथ कुटूंबले, सुदाम सलघंटे, अनिल अग्रवाल, प्रसाद झरकर, बालाजी तळेगावे इत्यांदीने दिले.



Post a Comment

0 Comments