Latest News

6/recent/ticker-posts

औसा-भादा रस्ता,प्रवास नाही सस्ता! आमदार दोन पण काम करणार कोण?

औसा-भादा रस्ता,प्रवास नाही सस्ता! आमदार दोन पण काम करणार कोण?


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा रस्ता हा रस्ता प्रवास नाही संस्ता असे म्हटल्यासारखे झाले आहे. कारण या भादावरून औसाकडे जात असताना दोन्ही बाजूंचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याची खड्डेमय चाळन झाल्याचे चित्र या रस्त्याने प्रवास करताना नक्कीच दिसून येते.

यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असून हा रस्ता होऊन अंदाजे दहा-पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला.हा रस्ता नवीन बनविण्यात आला होता परंतु त्यानंतर या रस्त्याची केवळ थातुर-मातुर मलमपट्टीच करणे सुरू आहे.यामुळे या रस्त्यावरून प्रवास केला असता वाहनांचे अनेक पार्ट खीळ खिळे होत आहेत तर मानव मानवाचे ही पार्ट म्हणजे मान पाठ मोठ्या प्रमाणात त्रास वाढल्याचे दिसून येत आहे.

कारण दुचाकी चार चाकी किंवा बस कोणत्याही वाहनात प्रवास केला असता घरी येताच शारीरिक वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. असा हा अत्यंत खराब झालेला भादा-औसा कधी होईल दुरुस्त अशी विचित्र परिस्थिती या रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर नागरिकाला नक्कीच अनुभवयास येते. यामुळे प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. परंतु आमदार दोन आणि याचे काम करणार कोण? असे चर्चा या रस्त्याबद्दल औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments