जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होताच भादा गावात वाटले पेढे;स्थानिक उमेदवारा ला उमेदवारी देण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
शेख बी जी
औसा: दि. 27 - लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जाहिर करण्यात आले. औसा तालुक्यातील भादा येथील गटा साठी यापूर्वी सर्व साधारण पुरुष यांना ही उमेदवारी मिळाली होती. धनंजय देशमुख हे या गटासाठी निवडून आले होते. हा गट म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी नेहमी काँग्रेस विजयी ठरत आली आहे. यावेळी आरक्षण जाहीर झाल्या नंतर अनुसूचित जाती साठी ही जागा आरक्षित झाल्याने भादा गावात आनंद व्यक्त केला जात आहे. भादा येथील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे वाटून या आरक्षणाचे स्वागत केले. येथील काँग्रेसचे कट्टर समर्थक तथा पत्रकार बालाजी उबाळे यांना उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्याकडून होत आहे.पक्षाशी एकनिष्ठ असलेले व सतत पक्षाच्या वाढीसाठी काम करणारे बालाजी उबाळे हे गावातील रोजगार हमी सेवक आहेत. यांनी गावातील तसेच परिसरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. पंचायत समिती असो की तहसील कार्यालय या ठिकाणची वेगवेगळी कामे ते नेहमी करत असतात. त्यांच्या या कार्याकडे पाहून गावातील काँग्रेसचे नेते यांनी हे आरक्षण जाहीर होताच बालाजी उबाळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला. एकूणच स्थानिक उमेदवाराला उमेदवारी मिळणार असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments