औसा तालुक्यातील 100 टक्के डिजीटल झालेली पहिली जि.प.प्रा.शा.बुधोडाची शाळा
बी डी उबाळ
औसा: अभिनव गोयल (मु.का.अ. जि.प.लातूर ) यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधोडा येथे राबवित असताना... शाळेचे आदर्श मुख्याध्यापक युवराज घंटे यांनी त्यांच्या मनातील एक स्वप्न सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीपुढे मांडले "आपल्या ग्रामीण भागातील चिमुकल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच मिळावे यासाठी आपली शाळा 100 टक्के डिजिटल करू या !"
सरांच्या हाकेला ओ देत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमरदीप कांबळे यांनी स्वतः एका वर्गासाठी स्मार्ट टीव्ही देण्याचे जाहीर करून दि 30 ऑगस्ट 2022 रोजी गणरायाच्या अगोदर टीव्हीसंचाचे आगमन शाळेत करुन आमचे 100 टक्के डिजीटल शाळेचे स्वप्न पूर्ण केले.
बालाच्याही पुढे एक पाऊल टाकत आज आमची जिल्हा परिषद बुधोडा शाळा सर्व रंगरंगोटीनी युक्त आणि १००% सर्व वर्गात चालू स्थितीत स्मार्ट टीव्ही, सुसज्ज कंप्युटर लॅब सहित कार्यालय असणारी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील एकमेव शाळा असेल अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
या कामी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा वारसागत शिक्षण प्रेम असणारे अमरदिप कांबळे, सौदागर कदम, प्रा.प्रल्हाद हेलाले, प्रा. गायकवाड यांसह जिल्हा परीषद बुधोडा शाळा सर्व दात्यांची शतशः ऋणी आहे !
असे म्हणून मदत करण्याची वृत्ती असणाऱ्या सर्व दात्याचे अभिनंदन केले जात असून जाहीर आभार मानले आहेत. या बुधोडा जिल्हा परिषद प्रशालेचा आदर्श औसा तालुक्यातील सर्व प्रशालानी घ्यावा आणि तेथील शालेय समिती ही आदर्श युक्त पद्धतीची असावी अशी ही चर्चा सध्या औसा तालुक्यातील सोशल मीडियावर केली जात आहे.

0 Comments