औसा तालूका अशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बी डी उबाळे
औसा: तालुका अशासकीय शालेय कर्मचारी पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 आॅगस्ट 2022 रोजी पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन आ. विक्रम काळे, औसा आ. अभिमन्यु पवार हे प्रमुख पाहूणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. सौ.सावंत रंजना व सावंत नेताजी सहशिक्षक श्रीराम माध्यामिक विद्यालय एरंडी सारोळा ता. औसा यांनी आ. अभिमन्यू पवार व शिक्षक आ. विक्रम काळे यांचा फेटा,शाल, श्रीफल, व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. यानंतर सालातील सर्व क्षेत्रातील दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर नूतन मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. नंतर पतसंस्थेचे अध्यक्ष कदम यांनी अहवाल वाचन केले. नंतर गुणवंत व सेवानिवृत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्था मित्र पुरस्कार देण्यात आला. आ. अभिमन्यु पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेच्या वाटचालीबदल समाधान व्यक्त केले. नंतर आ. काळे यांनी पतसंस्थेबदल समाधान व्यक्त केले. व रेडडी यांनी मनोगत मांडतांना संस्थेच्या व सभासदाच्या हितासाठी जे काही करता येईल त्याची ग्वाही दिली. कर्जाची मर्यादा वीस लाख आहे तसेच ठेवीवर व कर्जावरील व्याजाचा दर व लाभांश 10 टक्के असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन गायकवाड सरांनी केले तर आभार हलमडगे यांनी मानले. जाधव, परवेज मलेभारी, यादव, माने, पाटील व सर्व संचालक व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.

0 Comments