बुद्ध लेणी खरोसा येथे रविवार दि. 14 ऑगस्ट रोजी वर्षावास महोत्सवाचे आयोजन
बी डी उबाळे
औसा: लातूर जिल्ह्य़ातील ऐतिहासिक ठिकाण खरोसा लेणी ता.औसा जि.लातूर येथे पूज्यनिय भिख्खू संघाच्या उपस्थितीत वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य भिख्खू महाविरो थेरो ( काळेगाव ) यांची प्रमुख धम्म देसणा होणार आहे. या कार्यक्रमास औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास उपस्थिताना बुधोडा येथील उपासकांनी भोजन दानाची व्यवस्था केलेली आहे, वर्षावास काळात धम्म देसणा ऐकणे व शील, सदाचाराचे पालण करणे महत्वाचे असल्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.


0 Comments