शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याची आज होणारी मुलाखत माझी कर्मचाऱ्यांनी पाडली बंद
सलीमभाई पठाण
निलंगा: शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना अंबुलगा हा कारखाना ओंकार शुगर प्रा.लि यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे सदर कारखाना सुरू करण्यासाठी नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी आज मुलाखत घेण्यात येणार होती पण कारखान्याचे अगोदरचे कर्मचारी यांना कामावर न रुजू करुन घेता नवीन भरती प्रक्रिया ओंकार शुगर्सच्या प्रशासनाने राबवायचा प्रयत्न करुन आज मुलाखतीसाठी इच्छुकांना बोलावले होते. मात्र कारखान्याच्या जुन्या कर्मचाऱ्यांनी अगोदर आम्हाला सामावून घ्या आणि नंतरच नवीन भरती प्रक्रिया करा अशी मागणी केली प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने सदर मुलाखत प्रक्रिया कारखान्याच्या जुन्या कर्मचाऱ्यांनी हाणून पाडली. यावेळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पण मूळ कर्मचाऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाने आजची भरती प्रकियेची मुलाखत रद्द केली.
जोपर्यंत आम्हाला सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही भरती प्रक्रिया होऊ देणार नाही असे यावेळी जुन्या कर्मचाऱ्यांनी ठणकावून सांगितले
आमचा प्रश्न सोडविल्याशिवाय कारखाना चालु होऊ देणार नाही असा इशारा यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दिला.
0 Comments