Latest News

6/recent/ticker-posts

भादा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारुवर 06 ठिकाणी धाड टाकून 22 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

भादा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारुवर 06 ठिकाणी  धाड टाकून 22 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

बी डी उबाळे

औसा: दि.08 ऑगस्ट 22 रोजी  सकाळी 7 वाजले पासुन स.पो. निरीक्षक विलास नवले व सोबत पोलीस कर्मचारी टीम असे 10 जणांचे पथक तयार करून गोपनीय पद्धतीने खाजगी वाहन व पोलिस जीपसह  पो. स्टे.हद्दीत बऱ्याच गावात अचानक अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारले, व मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक केले. यामध्ये मुख्यतः शिवली, आशिव, बोरगाव, कालमाथा,बेलकुंड या गावात रेड केल्या आहेत.अवैध दारू विक्री करताना मिळून आलेल्यांना गावातच तसेच पोलिस स्टेशन येथे नेवून चांगलाच पोलिस खाक्या दाखवला.. व त्यांची नशा उतरवली. या छापेमारीत काही गावात बरेच दिवसांपासून अवैध दारू विकत असूनही पोलिसांना गुंगारा देणारे मिळून आल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात कोणीही अवैध दारू विक्री करू नये अन्यथा गावभर मिळालेली दारु घेऊन फिरवून वरात / धिंड काढली जाईल अशी तंबी देण्यात आली आहे. गावात कोणीही अवैध दारू विक्री करत असल्यास पो स्टे भादा व दारुबंदी विभाग, लातूर यांना नागरिकांनी माहिती द्यावी. माहिती देणार यांचे नाव गुपित ठेवले जाईल. असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.


पो.स्टे. हद्दीत कार्यवाही करूनही पुन्हा अवैध दारू विक्री करणारे जवळपास आठ ईसमावर म. पोलिस कायद्यान्वये हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले असून, आणखी इतर अवैध दारू विक्रेत्यांचे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.या बाबत कामगिरी करणाऱ्या टीममध्ये सपोनी- व्ही.एस. नवले, सफौ- महादेव गिरी, भिमु देवकर, पोहेका- चंदू सूर्यवंशी, टोपे, नापोका - शिवरुद्र वाडकर, चंद्रकांत कलमे, विठ्ठल दिंडे, डोलारे, चौघुले,आदी होते.

Post a Comment

0 Comments