Latest News

6/recent/ticker-posts

भादा ता औसा येथे महसूल आणि कृषी खात्याकडून संयुक्त पंचनामे सुरू

भादा ता औसा येथे महसूल आणि कृषी खात्याकडून संयुक्त पंचनामे सुरू

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे सध्या कृषी खाते आणि महसूल खात्याकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

जुलै मध्ये संतत धार पावसाचा तडाखा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात औसा तालुक्यामध्ये कोवळ्या पिकांना पाऊस जास्त झाल्याने आलेली हातची पिके ही अती पाण्याने खराब झाली असून अनेक ठिकाणी पेरणी क्षेत्र शिल्लक राहिले आहे तर जे काही ठिकाणी पेरणी केलेली आहे अशा पिकांनाही मशागत करता आली नाही.


यामुळे ती खरीप पिकेही खराब होत आहेत त्यामुळे महसूल आणि कृषी खात्याकडून संयुक्त पंचनामे भादा परिसरात सुरू करण्यात आले असून यावेळी भादा कृषी सहाय्यक सुरेखा गव्हाणे आणि भादा  सज्जाचे तलाठी राम दुधभाते यांनी भादा शिवारामध्ये सचिन माळी आणि इतर शेतकरी यांच्या बांधावर फिरताना पंचनामा टीम दिसत आहेत.


Post a Comment

0 Comments