Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबिर

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबिर


निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपूके यांनी केले याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड डॉ.धनंजय जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर, डॉ. गोपाळ मोघे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ कांचन भोसले डॉ.प्रिती चोपडे इत्यादी उपस्थित होते.


राष्ट्रीय सेवा योजनेच्या रक्तदान शिबिरामध्ये एकुण २७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडूर उमाजी तोरकड, मनोहर एखंडे, स्वयंसेवक आदिनाथ जाधव, स्वराज देशमुख, शकील शेख, रचना हजारे, माशाळकर ॠतूजा, यांनी परीश्रम घेतले. या शिबिरासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर रक्तपेढी विभागाचे रक्तसंक्रमण अधीकारी डॉ. कांचन भोसले, डॉ प्रीती  चोपडे, सिध्देश्वर चौधरी, बंकट सुर्यवंशी, नितीन गव्हाणे, गौरीशंकर स्वामी, हणमंत देठे, जाधव आर.एस., सिध्दोधन सुर्यवंशी, रोहन गिरमाजी, बळीराम कांबळे यांनी रक्तसंकलन करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

Post a Comment

0 Comments